भाजपचे निलंबित नेते नवीन जिंदाल यांना जिहाद्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या

महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाचे प्रकरण

डावीकडे नवीन जिंदाल

नवी देहली – पैगंबर यांच्या कथित अवमानावरून नूपुर शर्मा यांच्यासह भाजपने त्यांचे देहली येथील माध्यम शाखेचे प्रमुख नवीन जिंदाल यांनाही निलंबित केले आहे. जिंदाल यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आता जिहाद्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यांनी याविषयी ट्वीट करत माहिती देऊन देहली पोलिसांकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

नवीन जिंदाल यांनी ट्वीट करतांना म्हटले आहे की, मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की, माझी किंवा माझ्या कुटुंबाविषयीची कोणतीही व्यक्तीगत माहिती प्रसारित करू नका. मी विनंती केल्यानंतरही अनेक लोक माझ्या घराचा पत्ता सामाजिक माध्यमांत प्रसारित करत आहेत.

संपादकीय भूमिका 

धमक्या देणारे कायद्याचे पालन करत नाहीत कि त्यावर विश्‍वास ठेवत नाहीत ? ते नेहमीच कायदा हातात घेतात आणि त्यांना हवे ते करतात. त्यांच्या विरोधात तथाकथित निधर्मीवादीही तोंड उघडत नाहीत, यालाच या देशात ‘धर्मनिरपेक्षता’ म्हणतात !