शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण
मुंबई – एका यूट्युब वाहिनीवर इलियास शराफुद्दीन या धर्मांधाने शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह विधाने करून ‘शिवलिंगाला मानवी शरिराचा एक खासगी भाग’ असे संबोधले. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार धर्माभिमानी हिंदु अधिवक्ता धृतिमन जोशी यांनी ८ जून या दिवशी आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की,
१. व्हिडिओ लिंकमधील व्हिडिओमध्ये इलियास याने शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह विधाने केली.
२. ‘प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण हे इस्लामिक व्यक्तिमत्त्वाचे पुत्र आहेत आणि मी स्वतः राम-कृष्ण यांच्या बापाचा मुलगा आहे’, असेही तो म्हणाला. संबंधित वाहिनी अत्यंत कट्टर असून ती हिंदु धर्माचा अपमान करत आहे.
३. संस्कृत आणि वेदांमध्ये लिंग म्हणजे शिश्न नव्हे, तर ते एक प्रतीक आहे. इलियास याने उच्चारलेले शब्द आणि त्यानंतर केलेले हास्य हे पूर्णपणे अपमानास्पद अन् धार्मिक भावना दुखावणारे आहे. भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर यांसारखी ज्योतिर्लिंगे असलेल्या महाराष्ट्रातील कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावणारे त्यांचे वक्तव्य आहे.
४. त्याने धूर्तपणे प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे चुकीचे वर्णन केले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो आणि शिवप्रेमींनो, धर्मांधाला कठोर शासन होईपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्या ! |