
१. श्रीमती सुचेता जठार (श्रीमती शालिनी फाटक यांची मोठी मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘माझी आई स्वभावाने शांत आणि समाधानी आहे.
आ. तिचे खाण्या-पिण्याविषयी काहीच गार्हाणे नसते. आपण तिला जेवणात जो पदार्थ वाढू, तो ती देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करते.
इ. तिच्या मुखात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप अखंड असतो.
ई. ती मला प्रतिदिन सनातन संस्थेचा ग्रंथ वाचून दाखवते. आईला न समजलेले शब्द आणि वाक्य ती मला विचारते. वाचनात खंड पडला, तर तिला त्याची खंत वाटते.’
२. श्री. उल्हास फाटक आणि सौ. चित्रा उल्हास फाटक (श्रीमती शालिनी फाटक यांचा मधला मुलगा आणि सून), बडोदा, गुजरात.
अ. ‘मध्यंतरी आई दोन मास रुग्णाईत होती. त्या वेळी ती सकारात्मक राहिल्याने लवकर बरी झाली.’
३. श्री. सदानंद फाटक आणि सौ. रजनी फाटक (श्रीमती शालिनी फाटक यांचा धाकटा मुलगा आणि सून), मोगवासे, दक्षिण आफ्रिका.
अ. ‘आई नेहमी उत्साही असते. तिला कधी कसला कंटाळा येत नाही.
आ. ती आम्हाला भगवद्कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’
४. सौ. आरती साठे (धाकटी मुलगी), डोंबिवली, जिल्हा ठाणे.
अ. ‘माझ्या आईचे १६ व्या वर्षी लग्न झाले. त्यानंतर आम्ही ५ मुले, सासू-सासरे, दीर-नणंद या सर्वांचे दायित्व तिने निरपेक्षपणे घेतले.
आ. भक्ती आणि कर्म ही तिच्या आयुष्याची दोन चाके आहेत. त्यामुळे देवावर श्रद्धा ठेवून ती प्रत्येक संकटाला सामोरे गेली.’
५. सुश्री सुप्रिया जठार (श्रीमती शालिनी फाटक यांची नात, मुलीची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ अ. ‘माझ्या आजीने (श्रीमती शालिनी फाटक यांनी) कधीच कुणाचे अहित चिंतले नाही. तिने सर्वांना प्रेमच दिले.
५ आ. ग्रंथवाचनाची आवड असणे आणि ग्रंथात वाचलेले प्रत्येक सूत्र कृतीत आणणे : आजीला ग्रंथवाचनाची आवड आहे. आजी दासबोध, गुरुचरित्र, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे ग्रंथ, पू. के.वि. बेलसरे यांचे ग्रंथ आणि सनातनचे ग्रंथ नियमितपणे वाचते. आजीने ग्रंथ नुसते वाचले नाहीत, तर ग्रंथांतील प्रत्येक सूत्र कृतीत आणले. आजीने मला तिच्याकडील पू. के.वि. बेलसरे यांनी लिहिलेला ‘शरणागती’ हा ग्रंथ दिला. हा ग्रंथ बघितल्यावर ‘आजीने त्यातील महत्त्वाची सूत्रे लाल शाईच्या लेखणीने अधोरेखित केली आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
५ इ. आजीमध्ये जाणवलेले पालट
१. आजीची त्वचा मऊ झाली आहे.
२. तिच्या चेहर्यावर एका लहान निरागस बालकाप्रमाणे भाव जाणवतो.
३. ‘तिच्यातील प्रेमभावाचे रूपांतर प्रीतीत झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले.
४. आजीची सहजता वाढली आहे.
५. ‘आजी सर्वांकडे समभावाने पहात आहे’, असे मला जाणवले.
६. ‘तिच्यामधील स्थिरता वाढली आहे आणि ती घडणार्या घटनांकडे स्थितप्रज्ञतेने पहात आहे’, असे मला जाणवले.
७. आजीचे अनुसंधान वाढले असून ती सतत वर्तमानात रहाते.
५ ई. आलेल्या अनुभूती
१. ‘आजीच्या खोलीतील देवघरातील देवतांच्या मूर्ती आणि चित्रे सजीव झाली आहेत’, असे मला जाणवले. तिने देवघरात तिचे गुरु प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे छायाचित्र ठेवले आहे. ‘हे छायाचित्रही सजीव झाले असून त्यांचे ओठ हलत अहेत’, असे मला जाणवले.
२. ‘आजीच्या खोलीतील देवघरातून प्रकाशाचा मोठा झोत प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
३. आजीच्या खोलीत आणि तिच्या सहवासात असतांना माझा नामजप आपोआप होतो.
‘हे गुरुदेवा, ‘आपल्या कृपेमुळेच आजीच्या संदर्भातील ही सूत्रे माझ्या लक्षात आली आणि मला अनुभूतीही आल्या’, त्याबद्दल मी आपल्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
(सर्व सूत्रांसाठी दिनांक : २०.७.२०२६)
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : साधकांना गुरुकृपायोगरूपी तारक मंत्र प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !