
१. सेवेसाठी बाहेर जाण्यापूर्वी नामजपादी उपाय करणे, सनातनचे संत आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले समवेत आहेत’, असा भाव ठेवून गेल्यावर कोणताही त्रास न होणे
श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७४ वर्षे) : ‘मला सेवेनिमित्त बर्याच वेळा रेल्वेने प्रवास करावा लागतो. बाहेर अनेक ठिकाणी जावे लागते. तेव्हा मी बाहेर जाण्यापूर्वी ‘नामजपादी उपाय करते आणि स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना करते. बाहेर जातांना मी माझ्या समवेत सनातनचे संत अन् ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत’, असा भाव ठेवते. त्यामुळे मला बाहेर कोणताही त्रास जाणवत नाही. काही वेळा मी सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे) यांना सांगते, ‘‘आज मी अमुक ठिकाणी जाणार आहे.’’ तेव्हा त्यांचाही संकल्प कार्यरत होतो आणि माझे रक्षण होते.
२. एका आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने आश्रमातून बाहेर जातांना नामजपादी उपाय विचारणे आणि त्याप्रमाणे त्याने नामजपादी उपाय केल्याने तिचा त्रास न्यून होणे
सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे) : याच संदर्भात देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील एका साधिकेची अनुभूती सांगतो. त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यांना काही कामानिमित्त किंवा सेवेसाठी १ दिवस जरी बाहेर जावे लागले, तरी आल्यानंतर त्यांना २ – ३ दिवस पुष्कळ त्रास होतो. त्या खोलीतून बाहेर पडू शकत नाहीत. त्यांना अंगदुखी असते. त्यांची प्राणशक्ती अल्प झालेली असते. त्यांना बाहेर जाणे आवश्यक असायचे. त्यामुळे ‘‘यावर काय उपाय करू शकतो ?’’, असे त्यांनी मला विचारले. तेव्हा मी ‘‘प्रत्येक वेळी बाहेर जातांना त्रास होऊ नये; म्हणून नामजपादी उपाय विचारा’’, असे त्यांना सांगितले. त्यानंतर बाहेर जातांना त्या मला नामजपादी उपाय विचारायच्या आणि ‘दिवसभर बाहेर असल्यावर त्रास होऊ नये’, या ध्यासाने जेवढे शक्य आहे, तेवढ्या प्रमाणात त्या नामजपादी उपाय करण्याचा प्रयत्न करायच्या. त्यामुळे आता त्यांना बाहेरून आल्यानंतर होणारे त्रास, उदा. ‘पुष्कळ थकवा असणे, ‘काहीच करू नये’, असे वाटणे’, असे त्रास न्यून झाले आहेत. आता त्या प्रत्येक वेळी बाहेर जातांना मला नामजपादी उपाय विचारतात.
३. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने बाहेर जातांना प्रत्येक वेळी त्रासाच्या तीव्रतेनुसार उपाय विचारणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अच्छा ! त्या बाहेर जातांना प्रत्येक वेळी का विचारतात ? त्यांना नेहमीसाठी सांगितलेले नामजपादी उपाय लागू पडत नाही का ?
सद्गुरु राजेंद्र शिंदे : नाही. त्यांना आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे त्या प्रत्येक वेळी त्रासाच्या तीव्रतेनुसार नामजपादी उपाय विचारतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : बरं !
४. बाहेरच्या वातावरणातील त्रास आणि नकारात्मकता आश्रमातील साधकांना जाणवत नसल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘नशिबवान’ असे म्हटले आहे !
सद्गुरु राजेंद्र शिंदे : बाहेर सध्या कितीतरी त्रास आणि नकारात्मकता वाढली आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. ‘आश्रमातील साधक किती नशिबवान आहेत’, हे साधकांच्या अजून लक्षात येत नाही.’
पूर्वी एका कुटुंबासारखा एकत्रित असलेला समाज, आणि आजचा हा तुकड्या तुकड्यात विखुरलेला समाज !
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !