कानपूर हिंसाचाराच्या प्रकरणी झालेल्या कारवाईवरून शहराचे काझी मौलाना अब्दुल कुद्दूस हादी यांची धमकी
कानपूर (उत्तरप्रदेश) – जर कानपूर हिंसाचाराच्या प्रकरणी आमच्या घरांवर बुलडोझर चालवून एकतर्फी कारवाई करण्यात येत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. डोक्याला कफन बांधून रस्त्यावर उतरू, अशी धमकी कानपूर शहराचे काझी मौलाना अब्दुल कुद्दूस हादी यांनी दिली आहे.+
कानपुर हिंसा: बुलडोजर चला तो सर पर कफन बांध कर निकल आएंगे हम लोग, काजी हाजी अब्दुल कुद्दूस ने दिया बयान @NavbharatTimes https://t.co/Y2wwRzOlFm
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) June 7, 2022
मौलाना अब्दुल कुद्दूस हादी यांनी दावा केला की, हिंसाचाराचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात जे कुणी बाँब फेकत आहेत, ते हिंदू आहेत. दंगल हिंदूंनी नमाजपठण करून परतत असलेल्या मुसलमानांवर दगडफेक करण्यात आल्याने चालू झाली. (मुसलमानांचा कांगावा ! – संपादक) त्यानंतर मुसलमानांनी स्वरक्षणासाठी प्रत्युत्तर म्हणून दगडफेक केली आणि नंतर हिंसाचार झाला. जर मुसलमानांनी प्रत्युत्तर दिले नसते, तर मुसलमानांची हत्या झाली असती, असा आरोपही त्यांनी केला. (‘खोटे बोला; पण रेटून बोला’ अशा वृत्तीचे मौलाना ! यावर शेंबडे पोरतरी विश्वास ठेवील का ? – संपादक)
(सौजन्य : Aaj Tak)
(म्हणे) ‘कानपूर हिंसाचाराशी आमचा संबंध नाही !’ – पीएफ्आयचा दावा
कानपूर हिंसाचारामध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा हात असल्याचे म्हटले जात असतांना आता या संघटनेने एक पत्रक प्रसारित करून या हिंसाचाराशी आमचा संबंध नसल्याचा दावा केला आहे. (सध्या भारतात मुसलमानांकडून करण्यात येणारी अनेक आंदोलने आणि हिंसाचार यांमागे पीएफ्आय संघटना असल्याचे पुरावे पोलिसांना सापडत असतांना असा दावा करणे म्हणजे साळसूदपणाच होय ! – संपादक) या पत्रकात या संघटनेने म्हटले आहे की, या हिंसाचारानंतर मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे. बुलडोझर चालवण्याची धमकी दिली जात आहे. पोलीस पक्षपाती कारवाई करत आहे. मुसलमानांच्या विरोधात सूडाची कारवाई केली जात आहे.
(सौजन्य : OneindiaHindi)
संपादकीय भूमिकाकानपूरचा हिंसाचार मुसलमानांनी नमाजपठणानंतर केल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्यावरच कारवाई केली जाणार, हेही स्पष्ट आहे. तरीही अशा कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न म्हणून पुन्हा हिंसाचार करण्याची धमकी देणार्या अशा इस्लामी नेत्यांना पोलिसांनी सर्वप्रथम कारागृहात डांबले पाहिजे, असेच जनतेला वाटते ! |