उत्तरप्रदेशातील कानपूर येथे २ दिवसांपूर्वी मुसलमानांकडून नमाजपठणानंतर पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. त्यामध्ये ३-४ सहस्र मुसलमान हातगाड्यांवर दगडांचे ढीग रचून रस्त्यावर चालत दगडफेक करतांना दिसत होते. रस्ते आणि आजूबाजूचा परिसर येथे दगडांचा ढीग जमा झाला होता. एवढ्या मोठ्या संख्येने जमाव दगडफेक करत रस्त्यावर चालत येत असल्याचे पाहून कुणाच्याही अंगावर काटा आल्याविना रहाणार नाही. या दगडफेकीमुळे काश्मीर येथे काही वर्षांपूर्वी पोलीस आणि सैन्यदल यांवर दगडफेक करणार्या काश्मिरी मुसलमानांची आठवण येते. तसेच काही वर्षांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानात सहस्रोंच्या संख्येत मुसलमानांनी रस्त्यावर उतरून केलेली प्रचंड तोडफोड आठवते. ‘प्रत्येक दंगल किंवा तोडफोड नमाजपठणानंतरच का चालू होते ?’ हे सामान्यांना न उलगडणारे कोडे आहे. जणूकाही नमाजाच्या वेळी उपस्थितांना दंगल घडवण्याचे आदेश देण्यात येतात कि काय ?, असे वाटते. वर उल्लेख केलेल्या सर्व दंगली पूर्वनियोजित होत्या. त्यामुळे आक्रमक झालेल्या धर्मांधांपुढे ना पोलीस, ना प्रशासन, ना सामान्य हिंदू कुणाचीही डाळ शिजत नाही. त्यांना कुणीही आवरू शकत नाही, असेच चित्र असते.
अल्पसंख्यांकांची गुन्हेगारी वृत्ती !
उत्तरप्रदेशातील पोलीस मात्र वेगाने पावले उचलत कट्टरतावादी जमावावर काही घंट्यांच्या संघर्षानंतर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी अधिक कुमक घेऊन कोणताही मुलाहिजा न ठेवता दंगलखोरांना चोप देण्यास प्रारंभ केल्यावर त्यांनी शरणागती पत्करली. आतापर्यंत या कटाचा सूत्रधार हयात झफर हाश्मी आणि त्याचे ३ साथीदार यांसह एकूण ८०० जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. या दंगलीमध्ये पेट्रोलबाँब आणि अन्य प्राणघातक शस्त्रे यांचा वापर केला होता. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांमुळे धर्मांध आक्रमक झाले, असे सांगण्यात येते. नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हे नोंद झाले असून त्यांना बलात्कार आणि हत्या यांच्या धमक्या मिळत आहेत. या कट्टरतावाद्यांकडून कुठला राग कधी ? कुठे ? आणि कुणावर काढला जाईल ? याचा काही नेम नाही. त्यांची माथी भडकावणारे त्यांचे नेते, मौलवीच मुख्य गुन्हेगार असतात. ‘हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी इस्लामच्या प्रेषितांविरुद्ध अवमानकारक विधाने केली’, असे सांगत त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. कट्टरतावाद्यांकडून त्यांची हत्या करण्यात आल्यावर, हत्येचा निषेध दूरची गोष्ट; काही धर्मांध नेत्यांनी नाचून दाखवले. याला काय म्हणायचे ? हा तर हत्येचा एका समुदायाकडून घडवून आणलेला कटच होता. केवळ २ जणांना अटक करून नव्हे, तर एका समुदायावरच गुन्हा नोंद करायला हवा, अशी परिस्थिती आहे.
कानपूर दंगलीच्या प्रकरणी आता उत्तरप्रदेश पोलीस ‘पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेचा हात आहे का ? या दृष्टीने अन्वेषण करत आहे. पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाचे नाव पुन्हा एकदा या दंगलीच्या निमित्ताने पुढे आले आहे. सीएए आणि एन्.सी.आर्. या कायद्यांच्या वेळी देहली येथे झालेली भीषण दंगल असो किंवा केरळ येथे धर्मांधांकडून होणार्या हिंदूंच्या हत्या असोत, लव्ह जिहादची प्रकरणे असोत अथवा देशातील अन्य हिंसाचार असोत यामागे या संघटनेचा हात स्पष्ट दिसून आला आहे. एक धोकादायक आतंकवादी संघटना म्हणून पी.एफ्.आय. कुप्रसिद्ध होत असूनही या संघटनेवर देशभरात अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. पी.एफ्.आय.वर केंद्रीय यंत्रणांकडून नुकत्याच देशभरात धाडी घालण्यात आल्या हेही नसे थोडके !
योगींची नीती !
उत्तरप्रदेशात रामनवमीच्या निमित्ताने ८०० शोभायात्रा निघाल्या, तरी एकाही यात्रेवर कुठे आक्रमण झाल्याची घटना घडली नाही. हा योगी आदित्यनाथ यांच्या दरार्याचा परिणाम आहे. यापूर्वी ‘उत्तरप्रदेश म्हणजे सर्वाधिक दंगली होणारे राज्य’ म्हणून कुप्रसिद्ध होते. मुसलमानांकडून सातत्याने कुरापती काढून हिंदूंवर आक्रमणे करणे आणि राज्य अस्थिर करण्याचे प्रकार व्हायचे. योगी यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यावर अट्टल गुन्हेगारांना थेट यमसदनी धाडण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी गुन्हेगारांना पकडणे, त्यांच्यावर गुन्हे नोंद करणे, न्यायालयात खटला प्रविष्ट होणे, गुन्हेगाराला शिक्षा होणे या सर्व प्रक्रिया जलद होऊन गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला. आता परिस्थिती अशी आहे की, कुख्यात गुंड जामीन घेऊन बाहेर यायला घाबरतात. त्यांना वाटते की, त्यांना कधीही चकमकीत ठार केले जाईल. योगींनी अशा प्रकारे गुन्हेगारांवर चांगले नियंत्रण मिळवले आहे. दगडफेक करणारे, हिंदूंची दुकाने, घरे जाळणारे यांना शोधून काढून त्यांच्या घरादारांवर बुलडोझर चालवण्यात येतो. योगींनी दंगल घडवणार्या प्रत्येक धर्मांधाची अशी अवस्था केली असल्यामुळे ते ‘बुलडोझर बाबा’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. योगींच्या या नीतीचा उपयोग आता आजूबाजूची राज्ये, उदा. मध्यप्रदेश, आसाम यांनीही करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे कट्टरतावादी लवकर नियंत्रणात येतात, असे लक्षात आले आहे. अशा प्रकारच्या तोडीसतोड उपाययोजना केवळ योगीच करू शकतात. उत्तरप्रदेशात काही शहरांमध्ये हिंदूंच्या धार्मिक उत्सवांमुळे १ आठवडा मद्यमांसबंदी करण्यात आली होती. तेव्हा तेथील स्थानिक मुसलमानांनी ‘आम्हाला याविषयी काही अडचण नसून आम्ही हिंदूंना सहकार्यच करू’, असे प्रसिद्धीमाध्यमांपुढे सांगितले. आता कानपूर येथे दंगल घडवणार्या दंगलखोरांची घरेही पाडण्यात येतील. योगींच्या नीतीचे देशभर अनुकरण केल्यास सर्वच ठिकाणच्या दंगली नियंत्रणात येतील, हे निश्चित !
कट्टरतावाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यासाठी उत्तरप्रदेशप्रमाणे नीती अवलंबणे आवश्यक ! |