काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी

नवी देहली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी ट्वीट करून दिली. काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात सहभागी झाल्या होत्या. या चिंतन शिबिरामध्ये काँग्रेसचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनीही कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांना ८ जून या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे; मात्र आता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ही चौकशी होणार कि नाही ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.