बंगालमधील ‘हिंदु सभे’च्या ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री. शंभू गवारे

कोलकाता (बंगाल) – येथील ‘हिंदु सभा’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी सहभाग घेतला. या वेळी श्री. गवारे यांनी समितीच्या कार्याविषयी सर्वांना अवगत केले, तसेच ‘हलाल जिहाद’ला वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर वैध मार्गाने विरोध करण्याची आवश्यकता सांगितली. या बैठकीसाठी हिंदु सभेचे संस्थापक श्री. किरोनमॉय देबनाथ यांनी समितीला निमंत्रित केले होते. समितीचे कार्य ऐकून उपस्थित हिंदु सभेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे हिंदूसंघटनाचे कार्य करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. या बैठकीत हिंदु सभेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.