परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आरती !
जय देव, जय देव परब्रह्मस्वरूपा ‘जयंत’ सद्गुरुराया ।
अवतरलासी भुवरी ‘हिंदु राष्ट्र’ साकाराया ।
जय देव, जय देव … ।। १ ।।
स्थूल रूपे सनातन कार्य विश्वात पसरवूनी ।
सूक्ष्म रूपे जगताला व्यापिले या ब्रह्मांडी ।
जय देव, जय देव … ।। २ ।।
लीलामात्रे तूच साधकांकरवी करीसी कार्या ते ।
होऊ न देशी जाणीव त्यांना, तूच करीसी ते ।
जय देव, जय देव … ।। ३ ।।
‘तुम्ही जिंकला, मी हरलो’ वदुनी गर्वासी नासी ।
साधक असती प्राण, तू सर्वांच्या हृदयी वसशी ।
जय देव, जय देव … ।। ४ ।।
भवसिंधु तरण्या साधका ते उपदेशी ।
व्याधी निवारूनी आनंदिले त्वा साधकांशी ।
जय देव, जय देव … ।। ५ ।।
जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतूनी सोडविले अनेकांसी ।
शरण तुला मी, घ्या मज तव चरणांशी ।।
जय देव, जय देव … ।। ६ ।।
(टीप : गजानन महाराज यांच्या ‘जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया’ या आरतीच्या चालीवर)
– आपला अज्ञ बालक,
श्री. दत्तात्रेय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७७ वर्षे), गावभाग, सांगली. (२.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |