महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे तबलावादक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांना सुचलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांची स्तुती करणारे गुरुपरण (टीप १) !

वादनसाधना

१. तबलावादनाच्या सरावाच्या वेळी ‘गुरुपरण’ रचण्याचा विचार मनात येणे आणि देवानेच ते रचून अन् तालबद्ध करवून घेतल्याचे जाणवणे

श्री. गिरिजय प्रभुदेसाई

‘मी प्रतिदिन २ घंटे तबलावादनाचा सराव करतो. २६.९.२०२१ या दिवशी सकाळी तबलावादनाचा सराव चालू केल्यावर मी ‘तबल्यावर गुरुदेवांवर आधारित काय रचना करू शकतो ?’, असा विचार करत होतो. गुरुमाऊलींची स्तुती करणारे एखादे परण (टीप १) तबल्यावर रचायची माझी इच्छा होती. त्याच वेळी मला रामनाथी आश्रमातील श्री. सागर निंबाळकर यांनी रचलेली गुरुदेवांच्या १० हून अधिक गुणांचे वर्णन असलेली ‘गुणशती’ आठवली. त्याप्रमाणे ‘गुरुपरण’ रचून ते गुरुदेवांच्या चरणी अर्पण करूया’, असे मलाही वाटले.

टीप १ – तिहाईने (टीप २) शेवट होणारी, खुल्या आणि जोरकस अक्षरांनी युक्त पखवाजावर वाजवलेली रचना

टीप २ – ‘धा’ने संपणारा तुकडा समान अंतराने तीन वेळा वाजवून जेव्हा समेवर (टीप ३) येतो, त्यास ‘तिहाई’ म्हणतात.

टीप ३ – तालाच्या पहिल्या मात्रेवर

त्यानंतर एका घंट्यामध्ये देवाने माझ्याकडून गुरुदेवांची स्तुती करणारे तीनतालातील, म्हणजे त्रितालातील (टीप ४) गुरुपरण रचून ते तालबद्ध करवून घेतले. त्या परणाच्या बोलांचा अर्थही देवाच्या कृपेने सहज सुचत गेला. या गुरुपरणाची पढंत (टीप ५) केल्यावर माझी भावजागृती झाली. मी रचलेले हे गुरुपरण आठवून पुढचे साधारण ७ दिवस माझा भाव सतत जागृत होत होता.

या परणामध्ये तारक आणि मारक शक्ती दर्शवणारे तबल्याचे बोल आपोआप वापरले गेले. त्यामुळे माझ्याकडून जे काही रचले गेले, ते देवानेच या (श्री. गिरिजयच्या) माध्यमातून रचले. ‘देवाने माझ्याकडून गुरुपरण सिद्ध करवून घेतले’, याबद्दल मी देवाचरणी कृतज्ञ आहे.

टीप ४ – तबल्यावर वाजवला जाणारा एक ताल

टीप ५ – तबल्यावर वाजवण्यात येणारे बोल तोंडाने म्हणणे

२. गुरुपरणाचे बोल

राष्ट्र धर्म ज्ञान मोक्ष गुरुदेव ।
विष्णु कृष्ण अवतार भी गुरुदेव ।
धीट तीट धागेन दिगेन तागेन दिगेन धा ऽ ता ऽ
गुरुकृपायोग जनक पूज्य वे ।
दोष अहं दूर मेघ बरसते ।
धीरीधीरी तिरीतिरी घिन् ऽ नडान धिन् नग नग नग नग क्रधेऽत्त क्रधेऽत्त
ब्राह्म क्षात्र तेज-से हैं गुरुदेव ।
हिन्दू राष्ट्र विजयेन्द्र हैं गुरुदेव ।
दिन दिन दिन दिन धन धन धन धन धीट क्रधातीट धीट क्रधातीट क्रधातीट धा ऽ ता ऽ
ता ऽ न धीटता कतगदिगन तागेन धा ऽ ता ऽ धागेन धा ऽ धागेन तागेन ताऽक्रधा
धीरीधीरीकिडतक ता तिरीकिडतक ता तिरीकिडतक
प्रणाम धा ऽ । प्रणाम धा ऽ । प्रणाम धा । (तिहाई)

३. गुरुपरणाचा अर्थ

बोल : राष्ट्र धर्म ज्ञान मोक्ष गुरुदेव

हिंदी अर्थ : राष्ट्रगुरु, धर्मगुरु, ज्ञानगुरु और मोक्षगुरु आप ही हो गुरुदेव ।

मराठी अर्थ : राष्ट्रगुरु, धर्मगुरु, ज्ञानगुरु आणि मोक्षगुरु आपणच आहात गुरुदेव !

बोल : विष्णु कृष्ण अवतार भी गुरुदेव

हिंदी अर्थ : विष्णु, कृष्ण तथा उनके सभी अवतार भी आप ही हो गुरुदेव ।

मराठी अर्थ : श्रीविष्णु, श्रीकृष्ण, तसेच त्यांचे सर्व अवतारही आपणच आहात गुरुदेव !

बोल : धीट तीट धागेन दिगेन तागेन दिगेन धा ऽ ता ऽ

हिंदी अर्थ : चारों ओर, इधर उधर, अंदर बाहर आप हो ।

धीट तीट : चारों ओर

धागेन दिगेन : इधर उधर

तागेन दिगेन : अंदर बाहर

धा ऽ ता ऽ : आप हो

मराठी अर्थ : चारही दिशांना, इकडे-तिकडे आणि आत-बाहेर आपणच आहात !

धीट तीट : चारही दिशांना

धागेन दिगेन : इकडे-तिकडे

तागेन दिगेन : आत-बाहेर

धा ऽ ता ऽ : आपणच आहात ।

बोल : गुरुकृपायोग जनक पूज्य वे १

हिंदी अर्थ : गुरुकृपायोगकी निर्मिति करनेवाले (परात्पर गुरुदेवजी) पूजनीय हैं ।

मराठी अर्थ : गुरुकृपायोगाचे जनक असणाऱ्या गुरुदेवांचे आम्ही पूजन करतो.

बोल : दोष अहं दूर मेघ बरसते ।

हिंदी अर्थ : स्वभावदोष और अहं निर्मूलन की प्रक्रिया बताकर आनंद की बरसात करनेवाले मेघ आप ही हो गुरुदेव ।

मराठी अर्थ : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सांगून आनंदाची उधळण करणारे आपणच आहात गुरुदेव !

बोल : धीरीधीरी तिरीतिरी घिन् ऽ नडान धिन् नग नग नग नग क्रधेऽत्त क्रधेऽत्त

हिंदी अर्थ

धीरीधीरी तिरीतिरी : आसमान में बादलों की हलचल हो रही है ।

घिन् ऽ नडान धिन् नग नग नग नग क्रधेऽत्त क्रधेऽत्त : बादल गरज रहे हैं, बिजली चमक रही है और एक आकाशवाणी हो रही है ।

मराठी अर्थ

धीरीधीरी तिरीतिरी : आकाशात ढगांची हालचाल होत आहे.

घिन् ऽ नडान धिन् नग नग नग नग क्रधेऽत्त क्रधेऽत्त : ढगांचा गडगडाट होत आहे. विजा चमकत आहेत आणि एक आकाशवाणी होत आहे.

बोल : ब्राह्म क्षात्र तेज से  हैं गुरुदेव ।

हिंदी अर्थ : ब्राह्मतेज और क्षात्रतेज के समान हैं गुरुदेव ।

मराठी अर्थ : ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांसारखे आपणच आहात गुरुदेव !

बोल : हिन्दू राष्ट्र विजयेन्द्र हैं गुरुदेव ।

हिंदी अर्थ : हिन्दू राष्ट्र का विजय दिखानेवाले आप ही हैं गुरुदेव ।

मराठी अर्थ : हिंदु राष्ट्राचा विजय दाखवणारे आपणच आहात गुरुदेव !

बोल : दिन दिन दिन दिन धन धन धन धन धीट क्रधातीट धीट क्रधातीट क्रधातीट धा ऽ ता ऽ

हिंदी अर्थ : हिन्दू राष्ट्र आएगा, तो उस दिन सभी जगह (दिन दिन दिन दिन) शंख बजेंगे, नगाडे (धन धन धन धन) बजेंगे । उसकी आवाज ऐसी होगी ।

मराठी अर्थ : ज्या दिवशी हिंदु राष्ट्र येईल, त्या दिवशी सगळीकडे शंख (दिन दिन दिन दिन) वाजतील, नगारे (धन धन धन धन) वाजतील, त्यांचे ध्वनी असे असतील.

बोल : ता ऽ न धीटता कतगदिगन तागेन धा ऽ ता ऽ धागेन धा ऽ धागेन तागेन ताऽक्रधा

हिंदी अर्थ : ऐसे गुरु का गुणगान कहेंगे नहीं, या सुनेंगे नहीं, तो हमारा जीवन व्यर्थ हैं ।

ता ऽ न : ऐसे

धीटता : गुरु का

कतगदिगन : गुणगान

तागेन धा ऽ : कहेंगे नहीं

ता ऽ : या

धागेन धा ऽ : सुनेंगे नहीं

धागेन तागेन ताऽक्रधा : तो हमारा जीवन व्यर्थ है ।

मराठी अर्थ : अशा गुरूंचे गुणगान केले नाही किंवा ऐकले नाही, तर आपले जीवन व्यर्थ आहे.

कता ऽ न : अशा

धीटता : गुरूंचे

कतगदिगन : गुणगान

तागेन धा ऽ : केले नाही

ता ऽ : किंवा

धागेन धा ऽ : ऐकले नाही

धागेन तागेन ताऽक्रधा : तर आपले जीवन व्यर्थ आहे.

बोल : धीरीधीरीकिडतक ता तिरीकिडतक ता तिरीकिडतक

हिंदी अर्थ : आइए, ऐसे महान गुरु को हम सभी

मराठी अर्थ : अशा या महान गुरूंना आपण सर्व जण

बोल : प्रणाम धा ऽ । प्रणाम धा ऽ । प्रणाम धा ।

हिंदी अर्थ : प्रणाम करते हैं । प्रणाम करते हैं । प्रणाम करते हैं ।

मराठी अर्थ : प्रणाम करूया, प्रणाम करूया, प्रणाम करूया !’

– श्री. गिरिजय प्रभुदेसाई, संगीत विशारद (तबला), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.१.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक