आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा !
कोलकाता (बंगाल) – राज्याच्या मेदनीपूर जिल्ह्यात मुक्तीपदा मन्ना नावाच्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. मुलाचे नाव देवाशीष असून तो २२ वर्षांचा होता. ही घटना ७ मेची असल्याचे म्हटले जात आहे. बंगाल पोलीस ‘देवाशीष याने आत्महत्या केली’, असे म्हणत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मन्ना परिवाराकडून या प्रकरणी कोणतीच तक्रार करण्यात आलेली नाही. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांचा नुकताच बंगाल दौरा झाला. त्या वेळी त्यांनी फासावर लटकलेल्या स्थितीत आढळलेले भाजपचे पदाधिकारी अर्जुन चौरसिया यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. चौरसिया यांचा मृतदेह ६ मे या दिवशी लटकलेल्या स्थितीत आढळा होता.
संपादकीय भूमिकाभाजपचे कार्यकर्ते अथवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती यांच्या वारंवार होणाऱ्या कथित आत्महत्यांमागे काही काळेबेरे आहे का ? याची चौकशी होणे आवश्यक आहे. एकूणच बंगालमधील हिंदूंच्या विरोधातील परिस्थिती तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पुरेशी आहे. केंद्र सरकार या दिशेने पाऊल केव्हा उचलणार ? असा प्रश्न हिंदूंना पडला आहे ! |