भारतीय शासनकर्त्यांनी श्रीलंकेची ख्रिस्तीवादाकडे झपाट्याने वाटचाल होत असल्याचा धोका ओळखावा !

हिंदूंनो, स्वतंत्र ख्रिस्ती राष्ट्र निर्माण करण्याचे चर्चचे षड्यंत्र उधळून लावा !

‘साम्राज्यवादी, धर्मांतरणवादी परकीय ख्रिश्चन चर्च आणि जिहादी इस्लामला श्रीलंकेतील सिंहली-तमिळ संघर्षाचा लाभ होणार नाही, यासाठी श्रीलंका सरकारला दक्ष रहावे लागेल. या सर्व पार्श्वभूमीवर चेन्नई येथील एका अभ्यासू पत्रकाराने ‘तमिळ ईलम-ख्रिश्चन अजेंडा’ या विषयावर सविस्तर लेख लिहून चर्चच्या हस्तक्षेपावर प्रकाश टाकला आहे. या पत्रकाराच्या अभ्यासानुसार चर्चने एलटीटीईला संपूर्ण रसद आरंभापासून पुरवली आहे. त्याच वेळी श्रीलंका प्रशासनात सिंहली ख्रिश्चनांचा गट वाढेल, यासाठी चर्च यशस्वी झाले. सदर लेखाचा प्रतिवाद अद्याप संबंधितांनी केलेला नाही. सोलोमन बंदरनायके, डॉन स्टीफन सेनानायके, जॉन कॉटेलवल, सिरिमॉव्ह बंदरनायके, ड्युडली सेनानायके, ज्युनिस रिचर्ड, जयवर्धने, प्रेमदासा, रानील विक्रमसिंघे, चंद्रिका बंदरनायके कुमारतुंगे, पर्सी महिंद्रा राजपक्षे आदी श्रीलंकेचे राष्ट्रप्रमुख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ख्रिश्चॅनिटीशी संबंधित राहिले आहेत, अशी चर्चा आहे. या सर्वांवर चर्चचा पगडा आहे, याविषयी श्रीलंकेत बोलले जाते. यांचे जोडीदार ख्रिश्चन आहेत.


१. वांशिक भाषिक वादातून श्रीलंकेतील हिंदूंमध्ये फूट पाडण्याच्या कारस्थानात यशस्वी झालेले चर्च !

८५ टक्के हिंदू असलेल्या श्रीलंकेत चर्चने एलटीटीईच्या माध्यमातून सिंहली आणि तमिळ अशा वांशिक भाषिक वादातून उभी फूट निर्माण केली. ही फूट चर्चच्या स्वार्थासाठी होती.

२. तमिळनाडू आणि श्रीलंका येथे धर्मांतर करून ‘स्वतंत्र ख्रिस्ती राष्ट्र’ निर्माण करण्याचे चर्चचे कारस्थान !

संपूर्ण देशाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या योजनेचा चर्चचा अजेंडा (कार्यसूची) श्रीलंकेत अतिशय बेमालूमपणे राबवला जात आहे. या सगळ्या कारवाया तमिळनाडूतही केल्या जात आहेत. जयललिता आणि करुणानिधी हे तमिळ नेते स्वतःच्या सोयीसाठी एलटीटीईचे सूत्र वापरत आहे. चर्च अतिशय खुबीने या दोन्ही राजकारण्यांचा वापर करून घेत असे. चर्चला श्रीलंका आणि तमिळनाडू येथे ख्रिश्चनांची लोकसंख्या वाढवून ‘स्वतंत्र तमिळ ख्रिश्चन लँड’ निर्माण करायचे आहे. यासाठी एलटीटीईमधील तमिळ-ख्रिश्चन गट आणि श्रीलंका सरकारमधील सिंहली ख्रिश्चन गट यांचे महत्त्व वाढवून सिंहली-तमिळ फूट यशस्वीपणे पाडली गेली. या फुटीनेच श्रीलंका सतत अशांत राहिला. सततच्या संघर्षात समाजजीवन विस्कटून गेले. अशा विस्कटलेल्या समाजजीवनाला सांभाळण्यासाठी चर्च पुढे सरसावले. चर्चने केलेल्या सेवेतून लोकांचे धर्मांतर केले.

३. श्रीलंकेतील धर्मांतरणाला विरोध करणाऱ्या हिंदू नेत्याची हत्या करणारी हिंसक धर्मसंस्था !

श्रीलंकेत धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी हिंदु अफेअर्स विभागाचे संधी मंत्री टी. महेश्वरन् यांनी पुढाकार घेतला होता. या कायद्याचा प्रस्ताव सिद्ध करण्यासाठी श्रीलंकेतील बुद्धिस्ट-हिंदू नेते एकत्र आले होते; परंतु तो कायदा अस्तित्वात येऊ नये, यासाठी चर्चने श्रीलंका सरकारवर दबाव टाकला. धर्मांतराच्या विरोधात बौद्ध आणि हिंदू अल्पसंख्य अन् बहुसंख्य एकत्र येत आहेत, हे पाहून चर्चने मोठ्या खुबीने ‘इंटर रिलिजन्स कौन्सिल’च्या (आंतर धार्मिक परिषद) स्थापनेवर भर दिला. अशी कौन्सिल निर्माण करणे, हा चर्चच्या अख्रिस्ती देशात (नॉन ख्रिश्चन कंट्रीज) चर्चपुरस्कृत ‘इंटरफेथ डायलॉग’चा भाग आहे. टी. महेश्वरन् हे रानील विक्रमसिंघे मंत्रिमंडळात मंत्री होते. वर्ष २००४ मध्ये त्यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला होता; मात्र जानेवारी २००८ मध्ये शिवमंदिरात महेश्वरन् पूजा करत असतांना त्यांची हत्या करण्यात आली. श्रीलंका प्रशासनाने एलटीटीई आणि डग्लस देबंडा यांना दोषी ठरवले.

‘बीबीसी सिंहला डॉट कॉम’ संकेतस्थळाच्या बातमीनुसार डी.एन्.ए. चाचणीचा अहवाल त्यांच्या हत्येविषयी एकिकडे संशय व्यक्त करतो, तर दुसरीकडे त्यांच्याशी मिळताजुळताही होता. श्रीलंकन ज्युडिशियरीनुसार सुरक्षारक्षकाने ठार केलेला आक्रमणकर्ता जॉन्सन कॉलीन वसंयन् व्हॅलेंटिन हा होता. एकूणच टी. महेश्वरन् यांच्या हत्येची ही घटना चक्रावून टाकणारी होती. अशा अनेक घटना सिंहली-तमिळ वाद चालू रहावा, यासाठी घडवल्या गेल्या, असे अभ्यासकांचे मत आहे.

४. हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी चर्चसंस्थांचा कावेबाजपणा !

पोर्तुगीज, डच आणि ब्रिटीश राजवटीच्या काळात श्रीलंकेत ख्रिश्चॅनिटीने प्रवेश केला. वसाहतींचे राज्य गेल्यावरही चर्चने स्थानिकांच्या आधारे स्वतःचे प्रभुत्व वाढवण्यास चालू केला. एका माहितीनुसार ‘मेनस्ट्रीम’ चर्चेसने ‘न्यू ख्रिश्चन’ चर्चपासून अंतर ठेवण्यास आरंभ केला आहे. मेनस्ट्रीम चर्चेसमध्ये श्रीलंकेत कॅथॉलिक आणि अँग्लोन्स यांचा समावेश होतो. यांना ‘ओल्ड’ चर्चेस म्हणूनही ओळखले जाते. हे चर्च बौद्ध आणि हिंदु धर्मियांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवतात.

चर्चच्या जगभरातील अख्रिस्ती देशातील कारवाया अन् त्यांचा अजेंडा लक्षात येण्यापूर्वी त्यांचे हेतू साध्य झालेले असतात, असा इतिहास आहे.’

– श्री. मकरंद मुळे

(संदर्भ : विवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक, ‘विवेक विचार’, जून २००९)