आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ।

सौ. स्वाती शिंदे

आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करते ।
मनामनात भक्तीभाव जागृत ते करते ।

राष्ट्र-धर्म कार्यास्तव स्फूर्ती ते देते ।
त्याच्या सहवासाचे जणू वेडच ते लावते ।
सांगा बरे आता असे कोण ॥ १ ॥

जे आहे ब्राह्म आणि क्षात्र तेजाने युक्त ।
आपण सारेच जण त्याला ओळखतो ।
रोजच त्याची आतुरतेने वाट पहातो ।
नाही भेटले कधी, तर चुकचुकतो ॥ २ ॥

सांगते याची गुणवैशिष्ट्ये तुम्ही ओळखा फक्त ।
प्रत्येकच क्षेत्रासाठी ते योग्य दिशा देते ।
म्हणूनच ते सर्वांच्याच विश्‍वासास पात्र ठरते ।
एकटे असूनही ते अधर्मियांशी लढते ।
कलियुगी या धर्माची बाजू तेच परखडपणे मांडते ॥ ३ ॥

अनेकदा विरोधाला धीरोदात्तपणे सामोरे जाते ।
लढवय्ये ते नेहमीच विजयश्री प्राप्त करते ।
शिवरायाचा मावळाच जणू ते भासते ।
म्हणूनच संत, ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळवते ।
स्थुलासमवेत सूक्ष्माचीही दालने ते उघडते ।
आपत्काळाचे सार्‍यांनाच भान करवून देते ॥ ४ ॥

मनावर साधनेचा संस्कारच ते बिंबवते ।
सुटीवर कधीही न जाता अखंड कार्यरत रहाते ।
निष्काम कर्मयोगी म्हणावे याला कि ज्ञानयोगी ।
असा प्रश्‍न आम्हाला पडतो ॥ ५ ॥

लोकहो तुम्हा-आम्हा सार्‍यांनाच ते ।
पुष्कळ आवडते ।
सारेच जण आपण त्याच्या तेजाने भारावतो ।
आभामंडळात जैसा सूर्य तेजाने तळपतो ।
तैसेची हे दैनिक ‘सनातन प्रभात’ ।
आपल्या भेटीला येते ।
मानाचा मुजरा शतदा आम्ही तयाच्या चरणी करतो ।
आम्ही तयाच्या चरणी करतो ॥ ६ ॥

प्रत्येकाच्या मनीचे प्रश्‍न ते ओळखते ।
उत्तर देऊनी सार्‍यांच्या शंका दूर करते ।
गंमती सांगूनी कधी हसवते ।
उद्धाराच्या आनंदवार्ता ऐकून याच्या ।
भावविभोर आपण होतो ॥ ७ ॥

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०१९)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक