गेली १२ वर्षे ३२ सहस्र मुली बेपत्ता होईपर्यंत केरळमधील हिंदू झोपले होते का ?

‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंच्या अत्याचारावरील चित्रपट गाजत असतांना आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवण्यात येणार आहे. निर्माते विपुल शहा यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. विपुल शहा यांनी सांगितले, ‘मी सत्य कथेवर आधारित ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट गेल्या १० वर्षांत बेपत्ता झालेल्या ३२ सहस्र मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत.’