ब्रह्मकुंडली आणि ब्रह्मरंध्र

प.पू. दास महाराज

१. ब्रह्मकुंडलीमधून एक थेंब अमृतवृष्टी झाल्यावर साधू-संत पुन्हा ताजेतवाने होत असणे आणि पुढे अनेक वर्षे अन्नपाण्याविना तपश्चर्या करत असणे

ब्रह्मरंध्र आणि ब्रह्मकुंडली हे एकच असून त्यात भेद नाही. काही उन्नत साधू-संतांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांच्या ब्रह्मरंध्रामधून प्राणज्योत बाहेर पडते. ब्रह्मरंध्रालाच ब्रह्मकुंडलीनीचक्र असेही म्हणतात. साधू-संत अनेक मास (महिने) अन्न-पाणी वर्ज्य करून सहस्रो वर्षे तपश्चर्या करतात. त्या वेळी काही कालांतराने, म्हणजे सहस्रो वर्षे साधना झाल्यानंतर भगवंत या जिवांवर त्यांच्या ब्रह्मकुुंडलीमधून एक थेंब अमृतवृष्टी करतो. या एक थेंब अमृतवृष्टीमुळे ते साधू-संत पुन्हा ताजेतवाने होतात आणि पुढे अनेक वर्षे अन्न-पाण्याविना तपश्चर्या करतात.

२. एक थेंब अमृतवृष्टी साधू-संतांच्या विशुद्धचक्राच्या माध्यमातून शरिरातील सर्व पेशींना पुरवली जाणे

रुग्णाईत व्यक्तीला ज्याप्रमाणे ‘सलाईन’च्या माध्यमातून संपूर्ण शरिराला अन्न आणि पाणी यांचा पुरवठा केला जातो, त्याप्रमाणे सहस्रो वर्षे तपश्चर्या करणार्‍या साधू-संतांच्या ब्रह्मकुंडलीनीमध्ये परमेश्वर एक थेंब अमृतवृष्टी करतो आणि ती अमृतवृष्टी विशुद्धचक्राच्या माध्यमातून शरिरातील सर्व पेशींना पुरवली जाते.’ (हा प्रश्न मी स्वामी चिन्मयानंद यांना विचारला होता. त्या वेळी त्यांनी हे उत्तर दिले आहे.)

३. साधू-संतांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर ब्रह्मकुंडलीच्या जागी एक लहान छिद्र पडून त्यातून साधू-संतांची प्राणज्योत भगवंताशी एकरूप होत असणे

साधू-संत त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर याच ब्रह्मकुंडलीमधून देहत्याग करतात. त्या वेळी त्यांच्या ब्रह्मकुंडलीच्या जागी एक मोहरीएवढे लहान छिद्र पडते आणि त्यामधून त्यांची प्राणज्योत (जीवात्मा) बाहेर पडून भगवंताशी एकरूप होते. देहातून प्राणज्योत ज्या छिद्रातून बाहेर पडते, त्या छिद्राला (त्या स्थानाला) ब्रह्मरंध्र असे म्हणतात. हे स्थान ज्ञानचक्र आणि सहस्रारचक्र या दोघांच्या मध्यभागी असते.

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक