अजमेरमध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीची बलात्कार करून गळा चिरून हत्या

लव्ह जिहादचा आणखी एक बळी !

आणखी असे किती हिंदु मुलींचे बळी गेल्यावर सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे ? – संपादक

उजवीकडे आरोपीअरशद खान

अजमेर (राजस्थान) – राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पीसांगन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात लव्ह जिहादची एक घटना समोर आली आहे. अरशद खान नावाच्या मुसलमान तरुणाने १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर चाकूने गळा चिरून तिची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी उत्तरप्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील सराय सुल्तान येथील रहिवासी आहे. पीडित अल्पवयीन मुलगी अजमेरची रहिवासी होती. ‘इंन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती. आरोपी अरशद खान याला तिच्याशी निकाह करायचा होता; मात्र ती त्यासाठी सिद्ध नव्हती. २२ मार्च २०२२ या दिवशी अरशद खानने तिला भेटायला बोलावले. पीडिता तेथे पोचल्यावर आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली; मात्र पीडित तिने ती अमान्य केल्याने त्याने आधी तिच्यावर बलात्कार केला नंतर चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली.

आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी पीडितेच्या नातेवाइकांकडून आंदोलन

पीडितेचा मृतदेह जे.एल्.एन्. रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. पीडितेचे नातेवाईक आणि गावकरी आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन केले, अशी माहिती अजमेरचे पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी दिली.