दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अटकेपासून संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

‘नाय वरन भात लोन्चा…’ या चित्रपटात महिला आणि बालके यांची अश्लील दृश्ये दाखवल्याचे प्रकरण !

मुंबई – ‘नाय वरन भात लोन्चा.. कोन नाय कौन्चा’ या चित्रपटात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने मांजरेकर यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे.

‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कौन्चा’ या चित्रपटामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांची अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात मांजेरकर यांच्या विरोधात ‘पोस्को’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. हा रहित करावा, यासाठी मांजरेकर यांनी ही याचिका केली होती. भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सौ. सीमा देशपाडे यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. तक्रारीनंतरही पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका केली. यावर पोक्सो विशेष न्यायालयाने गुन्हा नोंद करून चौकशीचा आदेश यापूर्वीच दिला आहे.