पुणे येथील ‘इतिहास संस्कृती कट्टा’ आणि डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आयोजित व्याख्यानमाला !
पुणे – आदिलशाही आणि कुतुबशाहीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमण केले पाहिजे; म्हणून मिर्झाराजे जयसिंह यांनी शिवाजी महाराजांचे बलस्थान ओळखले आणि ते काबीज करण्याचा प्रयत्न केला. ओबडधोबड गडदुर्गांचा प्रदेश आणि मावळे हे शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे बलस्थान होते, असे मत इतिहास अभ्यासक विद्याचरण पुरंदरे यांनी व्यक्त केले. इतिहास संस्कृती कट्टा आणि डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘शिवाजी महाराजांची आग्रा भेट-पूर्वरंग’ या विषयावर भारत इतिहास संशोधन मंडळात व्याख्यान आणि चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्याचरण पुरंदरे आणि इतिहासतज्ञ मंदार लवाटे यांच्या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी करण्यात आली.