सर्वांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉक्टर आठवले !
सातारा रस्ता, पुणे येथील सौ. रश्मी बापट (वय ६८ वर्षे) या २२ वर्षे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका आहेत. त्या ४ वर्षांपासून भावसत्संग नियमित ऐकतात. सध्या चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगही त्या नियमित ऐकतात.
११.५.२०२१ या दिवशी साधना सत्संगात ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे कार्य आणि गुणवैशिष्ट्ये’ हा विषय घेतला. त्या वेळी विषय ऐकल्यानंतर सौ. बापट यांनी उत्स्फूर्तपणे खालील कविता म्हणून दाखवली. ती ऐकून सत्संगातील सगळ्यांची भावजागृती झाली. ही कविता त्यांना आधीच सुचलेली आहे.
तळमळ वाटे मनी माझिया । तळमळ वाटे मनी ।
या हो मम जीवनी । गुरु, तुम्ही या हो मम जीवनी ।। धृ ।।
सत्संग येऊ द्या घडू नेमाने । सत्संग येऊ द्या घडू ।।
घोट पचवू द्या कडू दुःखाचे । घोट पचवू द्या कडू ।।
तुम्हीच सारे आणाल घडवूनी पटले मनोमनी ।। १ ।।
विकल्प होऊ द्या कमी मनातील । विकल्प होऊ द्या कमी ।।
नष्ट होऊ द्या ‘मी’ माझ्यातील । नष्ट होऊ द्या ‘मी’ ।।
देहबुद्धी ही कमी करोनी । मार्ग निघे उजळुनी ।। २ ।।
सोनियाचा दिवस आजचा । सोनियाचा दिवस ।।
आनंद नाही मावत मनी । आनंद नाही मावत ।।
गुरुकृपेचा ओघ बरसे । सतच्या कार्यातूनी ।। ३ ।।
– सौ. रश्मी रामचंद्र बापट, सातारा रस्ता, पुणे. (११.५.२०२१)