सांगली – जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे १९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या आतंकवाद्यांच्या शोधमोहिमेच्या वेळी झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील शिगाव येथील सैनिक रोमित तानाजी चव्हाण (वय २२ वर्षे) यांना वीरमरण आले. हुतात्मा चव्हाण हे १ राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये कार्यरत होते. ते सैन्य सेवेमध्ये गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत होते.