नगर येथील प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने आयोजित श्री रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेस समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
नगर – भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन सांगितलेली ही रामरक्षा आहे. श्री रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय आणि तारक असून याच्या पठणाने मन आणि बुद्धी यांचा विकास होतो. लवकरच नगर शहरात १ सहस्र मुलांकडून रामरक्षा स्तोत्र पाठ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मार्गदर्शन या स्पर्धेचे परीक्षक श्री. बापू ठाणगे यांनी केले. ते प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळ, नगर आयोजित श्री रामरक्षा स्तोत्र पाठांतर कार्यक्रमात बोलत होते. या स्पर्धेस समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी छावा संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती सुरेखा सांगळे, शोभा ढेपे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही मनोगतात या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी श्री रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.