नैनिताल (उत्तरप्रदेश) येथे फिरायला नेण्याच्या निमित्ताने धर्मांधांकडून ३ युवतींवर बलात्कार
बरेली (उत्तरप्रदेश) – धर्मांधांनी अनुसूचित जाती जमातीच्या ३ युवतींना फिरायला नेण्याचे आमीष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी नावेद आणि नदीम यांच्यासह चारही आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून अन्य २ पसार आहेत.
‘यू ट्यूब’वर अभिनेत्री बनवण्याचे आमीष देऊन धर्मांधाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार !
धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदु मुलींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यासह धर्मशिक्षण घेणे आवश्यक ! – संपादक
पाली (राजस्थान) – येथे निझामुद्दीन उपाख्य राज खान याने ‘यू ट्यूब’वर एका १६ वर्षांच्या मुलीला अभिनेत्री बनवण्याचे आमीष देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने पीडितेला जोधपूर येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि ठार मारण्याची धमकी दिली.
१. औद्योगिक ठाणे क्षेत्रामध्ये रहाणारी पीडिता ‘यू ट्यूब’वर चित्रफिती बनवते. अलीकडेच तिची ओळख बाबरा हाल येथील निझामुद्दीन उपाख्य राज खान याच्याशी झाली होती. त्याने तिला ‘यू ट्यूब’वर पहिल्या क्रमांकाची अभिनेत्री बनवून देतो’, असे आमीष दाखवले. त्यावर पीडितेचा विश्वास बसला.
२. आरोपी पीडितेला ८ जानेवारी २०२२ या दिवशी घेऊन जोधपूर येथे गेला. तेथे एका सदनिकेमध्ये तिच्या समवेत एक विनोदी चित्रफीत मुद्रित केली. त्याच रात्री त्याने पीडितेवर बलात्कार केला.