‘१४ वर्षे वयाची कु. वैष्णवी कामत हिच्याप्रमाणे किती जण असे करतात ? अशा सेवेमुळे ती साधनेत लवकर पुढे जाईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘प्रतिवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. माझ्या शाळेतील काही मित्र ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतात. या वर्षी ‘हिंदु जनजागृती समितीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये’, याविषयीचे चलत्चित्र (‘व्हिडिओ’) सुश्री (कु.) भाविनीताईंनी (सुश्री (कु.) भाविनी कापडिया, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) मला पाठवले. मी ते चलतचित्र आमच्या मित्रांच्या ‘ग्रुप’वर पाठवले. ते पाहिल्यावर माझे मित्र मला म्हणाले, ‘‘असे काही असते’, हे आम्हाला ठाऊकच नाही. आम्ही या वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणार नाही.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मी ही सेवा करू शकले. त्यांनीच माझ्या मित्रांची ‘व्हॅलेंटाईन डे’विषयी जागृती करवून घेतली आणि त्यांच्याच कृपेने मी हे लिहू शकले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. वैष्णवी कामत (वय १४ वर्षे), गोवा (२९.२.२०२०)