अशा अमानुषतेमुळेच पाकमध्ये कुणी इस्लामचा अवमान करण्याचे धजावत नाही. याउलट भारतात हिंदूच स्वतःचा धमर्म आणि देवता यांचा अवमान करतात, तर अन्य हिंदू त्यास वैध मार्गानेही विरोध करत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक

खानेवाल (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खानेवाल जिल्ह्यातील जंगल डेरा गावामध्ये ईशनिंदा केल्याच्या प्रकरणी एका व्यक्तीला झाडाला लटकवण्यात आले आणि त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याला दगड मारण्यात आले. या व्यक्तीवर कुराणाची पाने फाडून त्याला आग लावल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्यक्तीला पोलिसांनी कह्यात घेतले होते; मात्र धर्मांधांच्या जमावाने पोलिसांच्या कह्यातून या व्यक्तीला सोडवून त्याला ठार मारले. या व्यक्तीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला; मात्र धर्मांधांनी त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. यापूर्वी पाकमधील सियालकोटमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काही कामगारांनी ईदनिंदेच्या आरोपावरून श्रीलंकेच्या एका नागरिकाला अमानुषपणे मारहाण करून, तसेच त्याला जिवंत जाळून त्याची हत्या केली होती.
कुरान अपवित्र करने के शक में भीड़ ने बोला हमला, मौके पर मौजूद पुलिस ने नहीं लिया कोई एक्शन #MobLynching #Pakistan https://t.co/2zaCz6zr62
— Zee News (@ZeeNews) February 13, 2022
अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !