
भाग्यनगर (आंध्रप्रदेश) – छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्या त्यांच्या आई जिजाऊमातेच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिवजी सेनेच्या वतीने ‘वीर मातृदिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने राष्ट्रीय शिवजी सेनेच्या वतीने धर्मकार्य करणार्या ५ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा समन्वयक श्री. चेतन गाडी यांचे आई-वडील अन् सनातनचे साधक सौ. पद्मा आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. जनार्दन गाडी यांचा सत्कार राष्ट्रीय शिवजी सेनेचे श्री. श्रीनिवास च्यारी यांनी केला. ‘सध्याच्या काळात धर्माला ग्लानी आली आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष घडवणार्या जिजामातेचा समाजासमोर आदर्श ठेवणे आवश्यक आहे’, या उद्देशाने वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून प्रसारण करण्यात आले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन