पोलिसांनी ध्वनीक्षेपक (डीजे) बंद केल्याचे कारण
|
बुलढाणा – वाढदिवसाच्या निमित्ताने शेगाव शहरात एके ठिकाणी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक (डीजे) चालू असल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून डीजे बंद केला. त्यानंतर जवळपास ३० जणांच्या जमावाने शेगाव पोलीस ठाण्यावर आक्रमण करून तेथील सर्व साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी ८ ते १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी या घटनेविषयी भाष्य करण्यास, तसेच माहिती देण्यास नकार दिला आहे. समाजकंटकांनी थेट पोलीस ठाण्यावर आक्रमण करत तोडफोड केल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. (पोलीस आक्रमणकर्त्यांवर आता तरी कठोर कारवाई करून स्वत:चा दरारा निर्माण करणार का ? – संपादक)