लोकहो, ‘राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रखर विचार मांडून हिंदूंना दिशादर्शन करणारे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा त्यांचे अभ्यासक’ असणारे राजा देसाई यांनी योग्य मतितार्थ काढला आहे का ?’

लोकहो, ‘राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रखर विचार मांडून हिंदूंना दिशादर्शन करणारे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा ‘स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचे अभ्यासक’ असणारे राजा देसाई यांनी योग्य मतितार्थ काढला आहे का ?’, याचा तुम्हीच विचार करा !

‘१२ जानेवारी २०२२ या दिवशी दैनिक ‘लोकसत्ता’च्या अंकात स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचे अभ्यासक राजा देसाई यांचा ‘स्युडो-हिंदुइझम्’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी ‘स्वामी विवेकानंद यांनी खालील विधाने केली होती’, असा दावा करून त्यावर भाष्य केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा लेखकाने काढलेला मतितार्थ तुम्हाला योग्य वाटतो का ?

१. ‘भारताचा सृष्टीच्या एकत्वाचा धर्म सुटला, तर भारताला कोणतीही शक्ती वाचवू शकणार नाही’, असे स्वामीजींनी म्हटले आहे. ६०० वर्षांच्या मुस्लिम राजवटीमध्ये हिंदु मानसावर विशेषतः धर्मासंबंधी तीव्र आघात करणार्‍या घटना घडल्या असूनही स्वामीजींच्या तोंडून इस्लाम आणि मुसलमान यांच्याविषयी एकही कटू शब्द का निघाला नाही ?

२. ‘माझ्या स्वप्नांतील भारताचे शीर असेल वेदांत, तर धड असेल इस्लाम’, असे स्वामीजी यांनी म्हटले होते. अशा प्रकारे स्वामीजींच्या भारताच्या चित्रात ते इस्लामला एवढे मोलाचे स्थान त्याने रुजवलेल्या सामाजिक समतेमुळेच देत नसावे का ?’