धर्मांतर नव्हे, राष्ट्रांतर !
‘काश्मीरच्या शेख अब्दुल्ला यांचे पूर्वज हिंदूच होते. त्यांच्या पूर्वजाचे नाव राघवराम कौल; पण काश्मीरमधील मुसलमान राजवटीत त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. ‘आज त्यांचे वंशज माजी मुख्यमंत्री फारूख, त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला भारताशी एकनिष्ठ आहेत’, असे म्हणता येईल का ?
अब्दुल्ला घराण्याचे पाकिस्तानविषयीचे प्रेम अनेकदा दिसून आले आहे. फारूख अब्दुल्ला वर्ष १९९० मध्ये काश्मीरचे मुख्यमंत्री असतांना तिथे हिंदूंचा अमानवीय संहार झाला, स्त्रियांवर अमानुष बलात्कार झाले आणि साडेचार लाख हिंदूंना काश्मीरमधून पलायन करावे लागले.’
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ