‘कोणत्याही राष्ट्रातील व्यक्तीच्या जन्मापासूनच तिला ‘धर्म वा पंथ’ यांची ओळख आपोआपच चिकटते. व्यक्तींनी मिळूनच राष्ट्र बनत असल्याने स्वाभाविकच राष्ट्रातील बहुसंख्यांक धर्मियांमुळे ते राष्ट्रही ‘त्या धर्मियांचे राष्ट्र’ म्हणूनच ओळखले जाते. अमेरिका, फ्रान्स, सौदी अरेबिया आदी सर्वच राष्ट्रे ही त्या त्या ‘बहुसंख्यांक पंथियांची राष्ट्रे’ म्हणूनच ओळखली जातात. मग भारतात विभिन्न धर्म-पंथांचे लोक राहत असतांना भारताची ओळख ‘निधर्मी’ कशी काय करून दिली जाते आणि भारतातील बहुसंख्यांक हिंदु धर्मियांमुळे भारताची ओळख ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का करून दिली जात नाही ? भावी हिंदु राष्ट्रात भारतातील बहुसंख्यांक हिंदु धर्मियांमुळे भारताची ओळख नेहमीच ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून करून दिली जाईल आणि तेच सर्वथा योग्यही असेल !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (२१.११.२०१९)