नागपूर – शहरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शहरात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. गणेश टेकडी मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल, तर ‘मास्क’ अनिवार्य करण्यात आला आहे. शिवाय सॅनिटायझरचा वापर करून सामाजिक अंतराचे पालनही केले जात आहे.