नागपूर येथील शाळा २६ जानेवारीपर्यंत बंद रहाणार ! – नितीन राऊत, पालकमंत्री

नितीन राऊत, पालकमंत्री

नागपूर – २४ जानेवारीपासून राज्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय राज्यशासनाकडून घेण्यात आला आहे. शहरात कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, त्याचे गांभीर्य ओळखणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील शाळा २६ जानेवारीपर्यंत बंद रहाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी २२ जानेवारी या दिवशी दिली.

ते पुढे म्हणाले की, लसीकरणाची गती वाढवून चाचण्याही वाढवल्या आहेत. आवश्यकतेनुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे, तसेच बाजारातील गर्दी अल्प करण्यासाठी प्रशासन उपाययोजना आखत आहेत. २४ जानेवारी या दिवशी व्यापारी संघटनांशी चर्चा करणार आहे.