‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. या दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अशी अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य !‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील ?’, या विचाराने त्यांच्या मुलांना साधना करण्यास विरोध करतात; परंतु ते लक्षात घेत नाहीत की, हे नातेवाईक केवळ याच जन्मातील आहेत. पालकांनी ‘जन्मोजन्मींचे नाते असणार्या देवाला काय अपेक्षित आहे?’, याचा प्रथम विचार केला पाहिजे आणि मुलांना साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य केले पाहिजे. ती त्यांची साधनाही होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१) |
‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)’ या सनातनच्या वतीने प्रकाशित ग्रंथाच्या संदर्भात पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) हिला आलेल्या अनुभूती
१. ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठाला चंदनाचा सुगंध येणे
‘आमच्याकडे ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)’ हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठाला चंदनाचा सुगंध येतो.
२. या ग्रंथाची पृष्ठसंख्या १६३ असूनही या ग्रंथातील चैतन्यामुळे तो वजनाने हलका वाटतो.
३. ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हे ग्रंथ पाहून ‘दोघेही एकरूप झाले आहेत’, असे वाटणे
या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर प.पू. दादाजी वैशंपायन यांचे छायाचित्र आहे. हा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या बाजूला ठेवल्यानंतर ‘योगतज्ञ दादाजी आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यात पुष्कळ साम्य आहे आणि ते एकरूप झाले आहेत’, असे मला जाणवले.
४. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ग्रंथातून ‘पुष्कळ प्रकाश येत आहे आणि त्या ग्रंथातील चैतन्यामुळे ‘हा ग्रंथ सतत वाचत रहावा’, असे वाटणे
माझ्याकडून ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग) हा संपूर्ण १६३ पानी ग्रंथ ३ दिवसांतच वाचून पूर्ण झाला. ‘हा ग्रंथ बाजूला ठेवूच नये’, असे मला वाटत होते. ग्रंथवाचन करतांना ‘या ग्रंथातून पुष्कळ प्रकाश येत आहे आणि त्या प्रकाशात बसूनच मी ग्रंथ वाचत आहे’, असे मला वाटत होते. ‘हा ग्रंथ स्वयंप्रकाशित आहे. त्या ग्रंथातील चैतन्यामुळे ग्रंथ सतत वाचत रहावा’, असे मला वाटत होते.
मला या ग्रंथाच्या संदर्भात चांगल्या अनुभूती दिल्यामुळे मी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– गुरुदेवांचे आनंदी फूल,
कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२१)
हर सांस में और हृदय मंदिर में आप ही गुरुवर ।
‘ एकदा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात केलेली कविता त्यांच्या चरणी अर्पण करते.
आंखें खोलूं तो आप ही दिखे ।
बंद नयनों में भी आप ही दिखे ।। १ ।।
आगे देखूं आपके दर्शन ।
पीछे देखूं आपके दर्शन ।। २ ।।
दश दिशाओं में आप ही गुरुवर ।
चराचर में व्याप्त आप ही गुरुवर ।। ३ ।।
हर सांस में आप ही गुरुवर ।
हृदय मंदिर में आप ही गुरुवर ।। ४ ।।
जो आप चाहें वह मैं करूं ।
जैसे आप चाहें वैसे ही रहूं ।। ५ ।।
अस्तित्व भी मेरा ना अनुभव कर पाऊं ।
आपसे ही मैं एकरूप हो जाऊं ।। ६ ।।
– गुरुदेवजी का आनंदी फूल,
कु. प्रार्थना महेश पाठक, (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०२१)