|
|
नवी देहली – भारत सरकारकडून चालू वर्षीच्या ‘अनिवार्य सुट्ट्यां’च्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचीमध्ये १४ ‘अनिवार्य सुट्ट्या’ देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळी आणि दसरा यांच्या सुट्ट्या आहेत. ख्रिस्ती सणांना २, तर शीख, जैन आणि बौद्ध यांच्या सणांना प्रत्येकी एक सुट्टी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुसलमानांच्या सणांसाठी ४ सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित राष्ट्रीय सणांच्या सुट्या आहेत. भारतात बहुसंख्य असणार्या हिंदूंच्या सणांना केवळ २ सुट्ट्या, तर मुसलमानांच्या सणांना ४ सुट्ट्या देण्यात आल्याने देशात सरकारी पातळीवर हिंदूंना अद्यापही दुय्यम वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये संताप व्यक्त होत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि महाशिवरात्री या हिंदूंच्या महत्त्वाच्या सणांचा ‘ऐच्छिक सुट्यां’मध्ये समावेश केला आहे. एवढेच नाही, तर होळीलाही ‘ऐच्छिक सुट्टी’ घोषित करण्यात आले आहे. मकरसंक्रांतीलाही सूचीमधून बाहेर ठेवण्यात आले आहे.
पैगंबर के जन्मदिवस पर ‘कंपल्सरी’ छुट्टी, रामनवमी-जन्माष्टमी पर ‘वैकल्पिक’ : 2022 की हॉलिडे लिस्ट देख भड़के नेटिजन्स, कहा- ये देश प्रोफेट की नहीं, देवताओं की भूमि है#HolidayList https://t.co/F09xo9PfPB
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 14, 2022