मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु महिलेवर बलात्कार करून तिचे धर्मांतर करू पहाणार्‍या अंसारला अटक !

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा आहे, तसेच तेथे लव्ह जिहाद विरोधी कायदाही अस्तित्वात आहे. असे असतांनाही धर्मांध हे हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यत ओढून त्यांचे धर्मांतर करू धजावतात ! यावरून कठोर कायद्यांसह त्यांच्यावर वचक बसवणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील एका महिलेवर बलात्कार करून तिला एका मदरशामध्ये नेऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अंसार नावाच्या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी ७ अन्य धर्मांधांवरही गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार अंसारने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला स्थानिक मदरशामध्ये नेऊन तिने धर्मांतर करावे, यासाठी वारंवार दबाव आणू लागला. या कालावधीत पीडिता एका हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटली. त्यांच्या साहाय्याने तिने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.