कुटुंबियांवरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यासाठी ब्रिटनमधील अहमदिया धर्मगुरुंकडून पीडित महिलेवर दबाव !

गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍यांविषयी जगभरातील मुसलमान गप्प का ? – संपादक

अहमदिया धर्मगुरु मिर्झा मसरूर

लंडन – बलात्कारपीडित महिलेने स्वत:चे वडील, तसेच इतर तिघांविरुद्ध केलेले बलात्काराचे आरोप मागे घ्यावेत, तसेच याविषयी पोलिसांत तक्रार करू नये, यासाठी येथील अहमदिया धर्मगुरु मिर्झा मसरूर यांनी पीडित महिलेवर दबाव आणल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मसरूर हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. पीडित महिलेने मसरूर यांच्याशी दूरभाषवर झालेले संभाषण सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती ब्रिटनच्या ‘डेली मेल’ने दिली आहे. ब्रिटनमध्ये अहमदिया संप्रदायाचे ३० सहस्र अनुयायी आहेत.