इंग्लंडमध्ये पाळीव पक्ष्यांच्या संरक्षणासाठी जंगली पक्ष्यांना गोळ्या घालून ठार करता येणार !

लंडन (इंग्लंड) – इंग्लंडमध्ये आता लोक शिकारीसाठी पाळण्यात येणार्‍या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी जंगली पक्ष्यांना गोळ्या घालू शकतात. पक्ष्यांसमवेत शिकारीचा खेळ खेळता यावा, म्हणून प्रतिवर्षी देशात कोट्यवधी सुंदर पक्षी पाळले जातात. या पक्ष्यांना प्रतिदिन खायला दिले जाते आणि त्यांना लठ्ठ बनवले जाते, जेणेकरून त्यांचा वेग अल्प होतो अन् शिकारीचा हंगाम आला की, त्यांना लक्ष्य करणे सोपे होते; मात्र जंगली पक्षीही त्यांच्यावर पाळत ठेवत असतात आणि या पाळीव पक्ष्यांना शिकार बनवतात. ‘दी गार्डियन’ या इंग्लंडच्या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पाळीव पक्ष्यांना वाचवण्यासाठी जंगली पक्ष्यांना मारण्याचा अधिकार द्यायचा कि नाही, असा वाद अनेक वर्षांपासून देशात चालू होता. आता वरील आदेशामुळे जंगली पक्ष्यांची शिकार करण्यास अनुमती मिळाली आहे.