शिक्षक पात्रता अपव्यवहार प्रकरण
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२० मधील ८०० अपात्र परीक्षार्थींकडून पैसे स्वीकारून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन संगणकावरून आरोपींनी परीक्षार्थींचे गुण वाढवले. या प्रकरणात सुपे यांच्या शासकीय वाहनावरील चालक सुनील घोलप यांच्यासह २ दलालांना सायबर गुन्हे शाखेने ३१ डिसेंबर या दिवशी अटक केली आहे. परीक्षार्थींची नावे तसेच सूची घोलप यांच्या भ्रमणभाषवरून घेणार्या ‘जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ आस्थापनाचे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या भ्रमणभाषवर पाठवण्यात आल्याचे, तसेच अपव्यवहारातून मिळालेल्या पैशांतून देशमुख यांनी वर्ध्यात शेतभूमी, तसेच मोटार खरेदी केल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.
रकमेतील काही हिस्सा शासकीय अधिकार्यांना देण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींच्या पोलीस कोठडीत ६ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.