मुंबई – माजी सुप्रसिद्ध अमेरिकी टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांनी अमेरिकेच्या सरकारला भारताने बनवलेल्या कोव्हॅक्सिन लसीला अमेरिकेत मान्यता देण्याची मागणी केली आहे. अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्वीट करून सरकारकडे हा आग्रह धरला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आपण फायझर आणि मॉडर्ना या आस्थापनांच्या लसींविषयी बोलतो; मात्र अन्यांना संधी दिली पाहिजे. कोव्हॅक्सिनला मान्यता का नाही ?
@CNN @FoxNews @US_FDA You always talk about Pfizer- J&J- Moderna vaccines — maybe a nod to #Covaxin – #ocgn – an opportunity to have an option – a choice- allow COVAXIN to get in the game— I’m no Dr.- but the others have had a chance- why not #COVAXIN !!! #Competition #lookitup
— Jimmy Connors (@JimmyConnors) December 30, 2021