आयुष्यात आव्हाने असणारच आहेत, ती तुमची शिकार आहे ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आयआयटी कानपूरचा ५४ वा दीक्षांत समारंभ

कानपूर (उत्तरप्रदेश) – आज तुम्ही देशाच्या सुवर्ण काळात प्रवेश करत आहात. राष्ट्राच्या अमृत काळाप्रमाणेच हा तुमच्या जीवनातला अमृत काळ आहे. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण आयुष्यात आव्हाने असणारच आहेत. जे त्यापासून पळतील, ते त्यांना बळी पडतील; मात्र जर तुम्ही आव्हानांच्या शोधात निघाला असाल, तर तुम्ही शिकारी आहात आणि आव्हाने तुमची शिकार आहेत, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी कानपूरचा ५४ व्या दीक्षांत समारंभात केले. २८ डिसेंबर या दिवशी हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल पदव्या प्रदान केल्या.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,

वर्ष १९३० च्या काळात २० ते २५ वर्षांच्या तरुणांना वर्ष १९४७ पर्यंतचा, स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रवास दीर्घ वाटला असेल. त्यांच्या जीवनातला तो सुवर्ण काळ होता. संवेदनशीलता, कुतूहल, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता ही तुम्ही कायम जपा ! ‘आयुष्यातील तंत्रज्ञानविरहित इतर सर्व गोष्टींविषयीही संवेदनशील रहा’, असा महत्त्वपूर्ण सल्लाही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.