केंद्र सरकारकडून कोरोनावरील आणखी २ लसींना, तर एका गोळीला मान्यता

२ लसींपैकी एक स्वदेशी लस

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधात्मक म्हणून आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी ‘कोरबीव्हॅक्स’ आणि ‘कोव्होव्हॅक्स’ लस, तसेच अँटी-व्हायरल (विषाणूविरोधी) औषध ‘मोल्नुपिरावीर’ यांना मान्यता दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्होव्हॅक्स’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने संमती दिली होती.

मांडविया म्हणाले की, ‘कोरबीव्हॅक्स’ लस भारतातील पहिली स्वदेशी विकसित ‘आर्बीडी प्रोटीन सब-युनिट’ लस आहे, जी भाग्यनगर येथील बायोलॉजिकल-ई आस्थापनाने बनवली आहे.