
जेव्हा ख्रिस्ती पंथ युरोपमध्ये पसरला, त्या वेळी अन्य सभ्यता नष्ट करण्यात आल्या. सेंट फ्रान्सिस झेविअर यानेही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. हे विष लोकांच्या बुद्धीमध्ये पेरले गेले असून त्यामुळे मंदिरांवरील आघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. देशविरोधींची विचारसरणी समजून घेऊन त्यांचा प्रतिकार करायला हवा. तेलुगु देसम् पार्टीच्या काळातही विजयवाडा येथे उड्डाणपूल बनवतांना सर्व छोटी मंदिरे तोडण्यात आली. जगनमोहन रेड्डी सरकारच्या विरोधात केवळ हिंदुत्वाच्या सूत्रावर राजकारण केले जाते. त्यामुळे व्यक्तीगत राजकीय लाभातून प्रत्येक पक्ष कार्यरत आहे. मंदिरांवरील आघाताच्या या घटना राज्य सरकार रोखत नसेल, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. या सर्व घटना रोखण्यासाठी एकच उपाय म्हणजे हिंदूंना जागृत करणे होय.
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
२२ ते २४ जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन होणार !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !