‘५.११.२०२१ या दिवसापासून कार्तिक मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
(साभार : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २८.११.२०२१ या दिवशी उत्तररात्री ५.३१ पासून २९.११.२०२१ या रात्री ९.४२ पर्यंत आणि ३०.११.२०२१ या रात्री ८.३४ पासून उत्तररात्री २.१४ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ आ. दग्धयोग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २९.११.२०२१ या दिवशी सोमवार असून उत्तररात्री ४.१४ पासून एकादशी तिथीला आरंभ होत असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्धयोग’ आहे.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. २९.११.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.५८ पासून उत्तररात्री ४.१४ पर्यंत आणि २.१२.२०२१ या रात्री ८.२७ पासून उत्तररात्री ६.४४ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ई. उत्पत्ती एकादशी : कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला ‘उत्पत्ती एकादशी’ म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या दामोदर रूपाची पूजा करतात. या एकादशीच्या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो, तसेच सहस्र गायी दान केल्याचे पुण्य मिळते. या दिवशी ‘एकादशी माहात्म्य’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांचे वाचन करतात. ३०.११.२०२१ या दिवशी उत्पत्ती एकादशी आहे.
२ उ. बृहस्पतिप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. गुरुवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘बृहस्पतिप्रदोष’ किंवा ‘गुरुप्रदोष’ म्हणतात. २.१२.२०२१ या दिवशी बृहस्पतिप्रदोष आहे. ‘बृहस्पतिप्रदोष’ हे व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो’, असे मानले जाते. ‘प्रदोष’ या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे, तसेच शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
२ ऊ. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, आळंदी : कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथीला आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी उत्सव साजरा केला जातो. २.१२.२०२१ या रात्री ८.२७ पर्यंत कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी आहे.
२ ए. शिवरात्री : प्रत्येक मासातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला ‘शिवरात्री’ व्रत करतात. निशीथकाली म्हणजे मध्यरात्री असलेल्या कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला शिवरात्री व्रत करावे. या दिवशी श्री शिव उपासना करावी. २.१२.२०२१ या दिवशी रात्री ८.२७ पासून दुसर्या दिवशी सायंकाळी ४.५६ पर्यंत कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी आहे.
२ ऐ. दर्श अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. शनिवार, ३.१२.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.५६ पासून ४.१२.२०२१ या दिवशी दुपारी १.१३ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.११.२०२१)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – घबाड मुहूर्त, दग्धयोग, भद्रा (विष्टी करण), एकादशी तिथी, तिथीवासर, प्रदोष व्रत, शिवरात्री, अन्वाधान आणि इष्टि यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । अर्थ : संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |