गोवंश : मानवी जीवनाची एकमेव संजीवनी !

तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यवाले आदी उत्तरप्रदेश येथील धर्मांध, हिंदुद्वेष्टे, नि(अ)धर्मी, पुरो(अधो)गामी, गो-कथाकार महंमद फैज खान यांच्याकडून काही बोध घेतील का ?

‘गायींचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणे आणि गोवंशाचे रक्षण करणे, याकरता उत्तरप्रदेश येथील महंमद फैज खान हे गो-कथा मोहीम राबवतात. ते गो-कथा सांगण्यासाठी कर्नाटकातील विजयपूर येथे आले असता त्यांनी स्थानिक ‘दैनिक संयुक्त कर्नाटक’ या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी विशेष संवाद साधला. तो त्या दैनिकाने प्रसिद्ध केला आहे. या संवादामधील काही भाग आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.’

१. गोवंश नष्ट झाल्यास मनुष्याचे जगणे कठीण !

‘मी गोमातेसाठी प्राण द्यायलाही सिद्ध आहे. गाय नाही, तर जीवन नाही. गोवंश नाहीसा झाला, तर मनुष्याला या भूमीवर जगणे कठीण होईल. गाय लोकांना तोडण्याचे काम करत नाही, तर जोडण्याचे काम करते. माझ्या गो-कथा मोहिमेला विरोध करणार्‍यांनी इस्लाम समजून घेतलेला नाही.

२. गोमांस भक्षण करणे म्हणजे कुष्ठरोगाला आमंत्रण !

गायीचे दूध हे अमृत, तूप औषधी, तर मांस रोगाला कारण होणारी वस्तू ! लाल मांस सेवन केल्यास कुष्ठरोग होतो, असे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे गोमांस भक्षण करू नका. आहाराची पद्धतच वेगळी आहे. तुम्हाला आवडीने विष सेवन करायचे, तर आमची काहीही अडचण नाही; पण धर्माच्या नावावर ‘गोमांस भक्षण करणे आमचा हक्क आहे’, असे बिंबवून निष्पापांची वंचना करू नका.

३. गोसंपत्तीच खरी संपत्ती असल्याने तिला वाचवणे आवश्यक !

गायीचे दूध परिपूर्ण अन्न आहे, तर गोमूत्र भूमीचे सत्त्व वाढवते. त्यामुळे गो-संपत्ती हीच खरोखरची संपत्ती आहे. विनाकारण कुणालाही विरोध करणे, टीका करणे, कुणाच्या भावनेला धक्का पोचवणे, अन्न-संस्कृतीचा तिरस्कार करणे, हा उद्देश नाही. गाय वाचली, तर आपण वाचू, हे सत्य जगाला विशद करत आहे.

४. देशाच्या लोकसंख्येत दुसर्‍या स्थानी असणारे मुसलमान शिक्षणात मागे का ?

परमात्म्याकडून प्रथम आलेले बोल म्हणजे ‘इक्रा.’ ‘वाचणे’ असा याचा अर्थ आहे. शिक्षणच माणसाला योग्य बनवण्याचा मार्ग आहे. तरीही काही जण शिक्षणापासून वंचित रहातात, हे मला दुःखदायक वाटते. भारतात अत्यंत अल्प लोकसंख्या असलेले जैन धर्मातील आहेत; पण जैन धर्मातील ९९ टक्के लोक सुशिक्षित आहेत. देशाच्या लोकसंख्येत दुसरा क्रमांक मुसलमान धर्मियांचा लागतो; पण या देशात मुसलमान शिक्षणात शेवटच्या स्थानावर आहेत. असे का ? याचा मला अर्थबोध होत नाही. आहार पद्धतीविषयी हक्क सांगणारे शिक्षणाचे महत्त्व याविषयी का सांगत नाहीत ?’ (अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक)

(संदर्भ : दैनिक ‘संयुक्त कर्नाटक’)