वेंगुर्ले – तालुक्यातील शिरोडा येथील समुद्रात ४ नोव्हेंबरला ५, तर ५ नोव्हेंबरला सायंकाळी २ पर्यटक, अशा एकूण ७ पर्यटकांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यातच समुद्रकिनारी अशा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने जीवरक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मालवण – ६ नोव्हेंबर या दिवशी येथील ‘चिवला बीच’ समुद्रकिनारी बुडणार्या पिंपरी, पुणे येथील एका महिलेला स्थानिक तरुणांनी वाचवले. पर्यटनासाठी पुणे येथून २० जणांचा एक गट मालवण येथे आला होता. हे सर्वजण ६ नाव्हेंबरला सकाळी अंघोळीसाठी चिवला बीच येथे समुद्रात उतरले होते. या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने एक महिला बुडत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी वेळीच धाव घेत महिलेला सुखरूप किनार्यावर आणले.