दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
नागपूर – हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी तक्रार आणि हा खटला रहित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात अर्ज प्रविष्ट केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणावर दीर्घ सुनावणीची आवश्यकता असून दिवाळीच्या सुटीनंतर पुढील सुनावणी घेण्यात येईल.
वरिष्ठांच्या दबावामुळे दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च २०२१ या दिवशी आत्महत्या केली होती. तत्पूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी ‘शिवकुमार यांच्याकडून होणार्या छळाविषयी व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे तक्रार करूनही तिची नोंद घेण्यात आली नाही’, असा आरोप केला होता. त्यावरून जिल्ह्यातील धारणी पोलिसांनी २६ मार्च २०२१ या दिवशी शिवकुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.