जानेवारी २०२१ मध्ये ‘स्पिरिच्युयल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’(एस्.एस्.आर्.एफ्.)चे संकेतस्थळ पाहिलेल्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

१. एस्.एस्.आर्.एफ्. इंग्रजी फेसबूक

१ अ. अनेक जणांचे मुख्यत्वे माझे जीवन पालटून टाकणार्‍या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे मी एस्.एस्.आर्.एफ्.ची आभारी आहे ! : ‘भीती आणि चिंता कशी घालवायची ?’, या विषयावरील थेट प्रक्षेपण पाहिले. हा विषय माझ्यासह अनेक जणांशी संबंधित आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे मलाही भविष्याची पुष्कळ चिंता वाटत होती. या सुंदर अशा प्रक्षेपणाने आम्हाला आमच्यातील भीती आणि चिंता घालवण्यास साहाय्य केले अन् आमची देवावरील श्रद्धा वाढवली. अनेक जणांचे मुख्यत्वे माझे जीवन पालटणार्‍या अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे मी एस्.एस्.आर्.एफ्.ची आभारी आहे. आपल्या या थेट प्रक्षेपणाचा मला पुष्कळ लाभ झाला. तुमच्या अशा आणखी थेट प्रक्षेपणांसाठी आणि ‘अशा दैवी प्रयत्नांत तुम्हाला यश लाभो’, अशा शुभेच्छा !’

– कु. अनिता दासवानी, स्पेन

२. ‘एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट’

२ अ. ‘मी ‘चिंता आणि भीती’ या विषयावर थेट प्रक्षेपण पाहिले. अंधारमय आणि वाईट शक्तींनी भरलेल्या या जगात प्रकाश आणल्यामुळे तुमचे आभार !’

– कु. सोनम श्रेष्ठा, नेपाळ