‘७.१०.२०२१ या दिवसापासून आश्विन मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायण, शरद ऋतू, आश्विन मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २१.१०.२०२१ पासून कृष्ण पक्ष चालू होणार आहे.

२. शास्त्रार्थ
२ अ. रविप्रदोष : त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करतात. रविवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘रविप्रदोष’ किंवा ‘भानुप्रदोष’ म्हणतात. भानुप्रदोष व्रत केल्याने उत्तम आरोग्य आणि दीर्घायु प्राप्त होते. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे. १७.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.४० नंतर त्रयोदशी तिथी आहे.
२ आ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १७.१०.२०२१ या दिवशी रविवार असून सायंकाळी ५.४० पर्यंत द्वादशी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.

२ इ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १७.१०.२०२१ या दिवशी सकाळी ९.५३ पर्यंत, १८.१०.२०२१ या दिवशी सकाळी १०.४९ पासून सायंकाळी ६.०८ पर्यंत आणि २३.१०.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.०२ पासून दुसर्या दिवशी सकाळी ६.१२ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ई. कार्तिक स्नानारंभ : सूर्याेदयकाली असलेल्या आश्विन पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकस्नान आरंभ होतो. २०.१०.२०२१ या दिवशी सूर्याेदयकाली आश्विन पौर्णिमा असल्याने कार्तिक स्नानारंभ आहे.
२ उ. कोजागरी पौैर्णिमा, ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, नवान्नप्राशन, लक्ष्मी आणि इंद्रपूजन ः यांविषयी लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
२ ऊ. आकाश दीपदान : आश्विन पौर्णिमेला आकाश दीपदान केल्याने ‘पूर्वजांना उत्तम गती प्राप्त होते’, असे मानले आहे.
२ ए. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’, असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १९.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.०४ पासून दुसर्या दिवशी सकाळी ७.४२ पर्यंत आणि २३.१०.२०२१ या दिवशी दुपारी १.४४ पासून उत्तररात्री ३.०२ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ऐ. अमृत योग : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने अमृत योग होतो. अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. २३.१०.२०२१ या दिवशी हा योग रात्री ९.५३ नंतर दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत आहे. या दिवशी शनिवार आणि कृत्तिका नक्षत्र आहे.
२ ओ. वृश्चिकायन : २३.१०.२०२१ या दिवशी सकाळी १०.२१ नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – प्रदोष, दग्ध योग, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), कुलधर्म, अन्वाधान, इष्टि, दुर्गाष्टमी, एकादशी आणि क्षय दिन यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांचे पुढील वचन लक्षात ठेवावे.
१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ
अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. ’
– सौ. प्राजक्ता जोशी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.(११.१०.२०२१)

‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !