साध्वी सरस्वती यांच्या उपस्थितीत आजपासून कुर्ला (मुंबई) येथे श्री यंत्राच्या ११ लाख मंत्राचे महाअनुष्ठान

मुंबई – पूज्य साध्वी सरस्वती यांच्या वंदनीय उपस्थितीत कुर्ला (पश्चिम) येथील श्री गाडगे महाराज विद्यालय येथे श्री यंत्राच्या ११ लाख मंत्राचे महाअनुष्ठान होणार आहे. १० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. ‘साध्वी सरस्वती फाऊंडेशन’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, तसेच श्री यंत्र प्राप्त करण्यासाठी ९२६६५५०४०४ आणि ८९६६०२७७७७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.