
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. रामदास गोडसे यांनी सनातनच्या ६० व्या संत पू. (कु.) रेखा काणकोणकर यांना कवितेतून केलेली प्रार्थना पुढे दिली आहे.
‘पू. रेखाताई, तुम्ही आहात आमच्या ‘आध्यात्मिक आई’ ।
तुमच्यातील अपार प्रीती करतसे वर्षाव साधकांवरी ।। १ ।।
आईची माया अनुभवतो तुमच्यातच आम्ही ।
तुम्ही प्रेमाने घेतले आम्हास जवळी ।। २ ।।

चुकलो जरी आम्ही, धीर दिलात तुम्ही ।
दिशा दिली साधनेची वेळोवेळी ।। ३ ।।
मार्गक्रमण करून घेत आहात तुम्ही ।
अशीच कृपा करावी नित्य साधकांवरी ।। ४ ।।
पू. रेखाताई, न्यावे आम्हास श्री गुरुचरणी ।
हीच प्रार्थना लेकरांची आपुल्या चरणी ।। ५ ।।
‘पू. रेखाताईंच्या सहवासाचा योग्य तो लाभ करून घेऊन आम्हाला श्री गुरूंना अपेक्षित असे घडता यावे’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पू. रेखाताईंमध्ये मला साक्षात् ‘अन्नपूर्णादेवी’चे अस्तित्व जाणवते. देवाने आम्हाला अशी ‘आध्यात्मिक आई’ दिल्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. रामदास गोडसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०२१)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
पंढरीची वारी
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
‘भेटीलागे जीवा, लागलीसे आस ।’
दिंडी चालली, दिंडी चालली ।
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !