दिंडी चालली, दिंडी चालली ।

श्री. किरण कुलकर्णी

विठ्ठल नामाचा गजर करत ।

मी पणाचा पाडुनी विसर ।।

माऊली माऊली म्हणूनी पाया पडत ।

दिंडी चालली, दिंडी चालली ।।

जातीभेद गाडूनी जाई ।

श्रीमंत गरीब एकची होई ।।

टाळ चिपळ्यांचा गजर करत ।

दिंडी चालली, दिंडी चालली ।।

सावळ्या विठ्ठलाला हृदयात ठेवूनी ।

स्थळ काळाचे भान विसरूनी ।।

ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषात ।

दिंडी पंढरी आली, दिंडी पंढरी आली ।।

गंगेसमान चंद्रभागेमध्ये ।

भागवत सारे स्नान करती ।।

जन्मोजन्मीच्या पापांचा नाश करण्या ।

दिंडी पंढरी आली, दिंडी पंढरी आली ।।

होता विठुरायाचे दर्शन ।

वारकर्‍यांच्या मनी होई आनंदी आनंद ।।

आनंदत, गहिवरत, अश्रू पुसत ।

दिंडी पंढरपुरी थांबली, दिंडी पंढरपुरी थांबली ।।

दिंडी परत चालली ।

साक्षात् विठू माऊलीही गहिवरली ।।

कार्तिकीला परत येण्याचे वचन देत ।

दिंडी आता परत चालली, दिंडी आता परत चालली ।।

– श्री. किरण कुलकर्णी, मिरज, जिल्हा सांगली. (१५.७.२०२६)